हे करा
- बँकेच्या संपर्क तपशिलांसाठी नेहमी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
- तुमच्या संपर्काचे तपशील बँकेकडे नेहमीच अद्ययावत करा आणि व्यवहारांसंबंधीच्या सूचना प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा.
- तुमच्या कॉम्प्युटरमध्ये/मोबाईलमध्ये नेहमी अस्सल अँटि-व्हायरस आणि अँटि-मालवेअर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून ते अद्ययावत ठेवा.
- तुमचा पासवर्ड स्ट्राँग आणि युनिक ठेवा
- तुमचा कार्ड नंबर, पासवर्ड किंवा इतर कोणतीही वैयक्तिक/संवेदनशील माहिती साठवलेली राहू नये म्हणून तुमच्या ब्राऊझरमधील ऑटोकंप्लिट सेटिंग बंद करा.
- प्ले स्टोअरमधून किंवा ॲप स्टोअरमधून कोणतेही ॲप्स डाऊनलोड करण्यापूर्वी सावध राहा.
- व्यवहार करताना तुमच्या वेब ब्राऊझरच्या स्टेटसमध्ये पॅडलॉक साईन किंवा https आहे का ते पहा.
- ज्या संदेशांमधून संवेदनशील तपशील मागितले जातात, त्यांच्यातील स्पेलिंगच्या चुका नेहमीच शोधा, त्यामुळे तुम्हाला खोटे संदेश शोधण्यास मदत होईल.
हे करू नका
- पिन, पासवर्ड, ओटीपी किंवा कार्डचे तपशील यांसारखे संवेदनशील तपशील इतर कोणाला कधीही सांगू नका.
- तुमच्या बँक खात्याला ॲक्सेस करताना पब्लिक वाय-फाय किंवा मोफत व्हीपीएन (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) / पब्लिक काँप्युटर्स यांचा वापर करणे टाळा
- अज्ञात स्रोत/सेंडर (प्रेषक) आयडीकडून प्राप्त झालेल्या लिंक्सवर क्लिक करू नका.
- 12345, नावे, जन्मदिन, इत्यादींसारखे नेहमी वापरले जाणारे पासवर्ड्स ठेवू नका.
- तुमचा बँकिंग पासवर्ड कुठेही लिहून ठेवणे आणि ब्राऊझरमध्ये सेव्ह करून ठेवणे टाळा.
- रिमोट शेअरिंग ॲप्स डाऊनलोड करू नका, उदाहरणार्थ, एनीडेस्क.
- यूपीआयच्या माध्यमातून पैसे प्राप्त करण्यासाठी क्यूआर (QR) कोड स्कॅन करू नका किंवा पिन (वैयक्तिक ओळक क्रमांक) किंवा ओटीपी (वन टाईम पासवर्ड) प्रविष्ट करू नका.
- एटीएममध्ये अनोळखी व्यक्तींची मदत घेऊ नका.
लक्षात ठेवा:
कोटक महिंद्रा बँक किंवा तिचे कर्मचारी/प्रतिनिधी तुमच्या वैयक्तिक खात्यासंबंधीची माहिती कधीही विचारणार नाहीत.
सुरक्षित रहा, सावध रहा!